Post office Scheme in Marathi | पोस्ट ऑफिस बचत योजना मराठी | पोस्ट ऑफिस योजना 2023 मराठी |(नवीन) पोस्ट ऑफिस योजना 2023

पोस्ट ऑफिस योजना 2023 (Post office Scheme in Marathi), पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला इतर बँका पेक्षा  जास्त व्याज मिळते. सरकार आपल्या बहुतांश बचत योजनांवरही कर सूट देते. या लेखात  सहा  सर्वोत्तम पोस्ट ऑफिस बचत योजना कोणत्या आहेत हे सांगू? पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम बचत योजना कोणत्या आहेत?

वृद्धांसाठी सर्वोत्तम बचत योजना म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. या योजनेवर सरकार सर्वाधिक व्याज (८.२ ) आणि कर सूटही देते. 2023 च्या अर्थसंकल्पात सरकारने आपली ठेव मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये केली आहे. यापूर्वी 1 जानेवारी 2023 पासून सरकारने व्याजदर 8.0% पर्यंत वाढवला होता. यानंतर, पुढील तिमाहीसाठी (एप्रिल ते जून 2023) व्याजदर आणखी वाढवून 8.2% करण्यात आला आहे.

मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी सर्वोत्कृष्ट बचत योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. सरकार सध्या या योजनेवर ८.०% व्याज देत आहे. लहान रक्कम जमा करून, तुम्ही तुमच्या मुलीसाठी 2.69 लाख ते 67.43 लाख रुपये परत मिळवू शकता. 

पैसे दुप्पट करण्याच्या योजनेचे नाव किसान विकास पत्र आहे. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये, तुम्ही जमा केलेली रक्कम 10 वर्षांनंतर दुप्पट होते. 1 एप्रिल 2023 पासून, सरकारने त्याचा व्याजदर 7.5% पर्यंत वाढवला आहे. आवश्यक असल्यास, अडीच वर्षांनंतर, आपल्याला खाते बंद करून रक्कम काढता येईल

पोस्ट ऑफिस योजना 2023 (Post office Scheme in Marathi 2023) पोस्ट ऑफिस च्या खूप सार्‍या योजना सध्या उपलब्ध आहेत, त्यामध्ये फिक्स्ड डिपॉजिट असो, RD (Recurring Deposit) आणि मासिक प्राप्ती योजना , जेष्ठ नागरिक बचत योजना . ह्या लेखामध्ये आपण मुख्य 6 योजनाची माहिती करून घेणार आहोत.  तसेच सरकारने चालू वित्तीय वर्षासाठी एप्रिल 2023 ते जून 2023 ह्या तिमाहीसाठी नवीन व्याज दर लागू करण्यात आले आहेत ते आपण खाली चार्ट मध्ये दिले आहेत. 

पोस्ट ऑफिस योजना 2023 मध्ये एकूण 13 योजना 2023 मध्ये सुरू आहेत त्यामधील काही लाभदायी योजनांची माहिती आपण आज घेऊयात

1. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Post Office Senior Citizen Savings Scheme)

जेष्ठ नागरिक बचत योजनेचा
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना

पोस्ट ऑफिस मधील जेष्ठ नागरिक बचत योजनेचा लाभ 60 वर्षा पेक्षा जास्त वय असणारा सामान्य व्यक्ती,  55 ते 60 वर्ष असणारा सेवानिवृत्त नागरी सेवक आणि  50 ते 60 वर्ष निवृत्त संरक्षण कर्मचारी ह्याचा लाभ घेऊ शकतात. ह्यासाठी आपले अकाऊंट खाते वैयक्तिक क्षमतेने किंवा केवळ जोडीदारासह उघडले जाऊ शकते. आणि संयुक्त खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम फक्त पहिल्या खातेदारालाच देय असते.

  • जेष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये किमान 1000 रुपये जमा करून ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते उघडता येते.
  • 2023 च्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेत पैसे जमा करण्याची मर्यादा १५ लाखावरून 30 लाख रुपये केली आहे. ही मर्यादा १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.
  • मुदतीचा कालावधी हा  5 वर्षांसाठी असून  आणि तुम्हाला प्रत्येक तिमाहीला  व्याजाच्या स्वरूपात निश्चित उत्पन्न मिळते. 5 वर्षानंतर, तुमची ठेव रक्कम देखील परत केली जाते.
  • सरकारच्या नवीन एप्रिल 2023 ते जून 2023  पर्यंत उघडलेल्या खात्यास  8.2% व्याज दर भेटेल. आणि तो आपल्या अकाऊंट वरती मार्च, जून, सेप्टेंबर आणि डिसेंबर मध्ये आपल्या सेविंग अकाऊंट वरती जमा होईल.
  • जर तुम्ही 1 लाख रुपये जमा केले तर प्रत्येक तिमाहीत तुम्हाला 2050 रुपये भेटतील. जर तुम्ही यापेक्षा कमी किंवा जास्त रक्कम जमा केलीत तर त्यानुसार तुम्हाला उत्पन्न कमी-जास्त मिळते,
  • पोस्ट ऑफिस च्या 2013 च्या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरती 1.50 लाखांपर्यंतच्या ठेवींवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे.

2. सुकन्या समृद्धी योजना  (Sukanya Samriddhi Yojana)

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही आपण पोस्ट ऑफिस किवा कोणत्याही बँकेमध्ये सुरू करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला सारखाच व्याज दर भेटतो.     

  • कोणतेही पालक त्यांच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धीचे खाते उघडू शकतात. कायदेशीर पालकही आपल्या मुलीसाठी हे खाते उघडू शकतो. तसेच तुम्ही आपल्या दोन मुलींच्या नावे आपले अकाऊंट उघडू शकता, दुसरी मुलगी जुळी असेल तरच तुम्ही आपल्या तिसर्‍या मुलींच्या नावे अकाऊंट ओपेन करू शकता
  • एकाच मुलीच्या नावे एका पेक्षा जास्त अकाऊंट तुम्ही ओपेन करू शकत नाही.
  • आपण 250 रुपये भरून सुकन्या समृद्धी योजनेचे अकाऊंट ओपन केले जाऊ शकते आणि नंतर 250 ते 1.5 लाख रुपये पर्यत्न तुम्ही वर्षाला जमा करू शकता
  • यामध्ये, जमा केलेल्या पैशावर वार्षिक 8.0% दराने व्याज मिळते. सरकार दर तिमाहीपूर्वी नवीन व्याजदर जाहीर करते. सध्या 1 एप्रिल 2020 पासून त्याच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  • सुकन्या योजनेचे खाते 21 वर्षे चालते, परंतु पैसे जमा करण्यासाठीची सूट सुरुवातीपासून केवळ 15 वर्षांसाठीच राहते.
  • 15 ते 21 वर्षांपर्यंत, तुमच्या आधीच्या ठेवींवर व्याजदर चक्रवाढ होत राहतो. 21 वर्षांनंतर, तुमच्या मुलीला संपूर्ण ठेव आणि व्याज जोडून एकूण रक्कम मिळते. मुलीच्या लग्नाच्या वेळीही खाते बंद करून संपूर्ण पैसे काढता येतात.
  • Ø  काही विशेष परिस्थितींमध्ये, खाते मध्यभागी बंद करण्याची सुविधा आहे, जसे की- खातेदार मुलीच्या मृत्यूवर, खातेदार मुलीच्या गंभीर आजाराच्या बाबतीत आणि मुलीच्या खातेदाराच्या पालकाच्या मृत्यूवर.
  • तुम्ही जमा केलेल्या पैशावर 80C अंतर्गत 1.5 लाख रुपये कर सूट घेऊ शकता. सुकन्या खात्याच्या व्याज आणि मुदतपूर्तीवर संपूर्ण कर सूट आहे

टीप: सुकन्या समृद्धी खात्यासाठी खाते विस्तार करता येत नाही. मॅच्युरिटीनंतर तुमच्या मुलीला त्याचे सर्व पैसे मिळतात. मुलीला ते मिळते कारण 18 वर्षे पूर्ण झाल्यावर खाते तिच्या नावावर होते. त्यानंतर त्याची नवीन केवायसी कागदपत्रे (फोटो, ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा) सबमिट केल्यानंतर खाते त्याच्या नावावर हस्तांतरित केले जाते.

3. किसान विकास पत्र योजना (Kisan Vikas Patra Scheme)

कोणतीही प्रौढ व्यक्ती त्याच्या नावावर किसान विकास पत्र खाते उघडू शकते. संयुक्त खाते 2 किंवा 3 लोक एकत्र उघडू शकतात. मुलाच्या नावाने त्याच्या पालकाच्या वतीने किसान विकास पत्र खाते देखील उघडले जाऊ शकते. 10 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मूलही हे खाते स्वतःच्या नावाने उघडू शकते. किमान 1000 रुपये जमा करून किसान विकास पत्र खाते उघडता येते. कमाल ठेवीवर कोणतीही मर्यादा नाही, तुम्ही रु. 100 च्या पटीत कोणतीही रक्कम जमा करू शकता आणि परिपक्वतेवर दुप्पट रक्कम मिळवू शकता. एका व्यक्तीच्या नावाने अनेक खातीही उघडता येतात.

सध्या, किसान विकास पत्र खात्यावर वार्षिक 7.5% व्याज मिळत आहे आणि तुम्हाला ९ वर्षे आणि ११ महिन्यांनंतर तुमची ठेव दुप्पट मिळते. तुम्ही 1,000 रुपये जमा केल्यास तुम्हाला ९ वर्षे आणि ११ महिन्यांनंतर 2,000 रुपये परत मिळतील. तुम्ही 1 लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला 2 लाख रुपये परत मिळतील. त्याचप्रमाणे तुम्ही जेवढे पैसे जमा करचाल ते पैसे तुम्हाला डबल भेटतील.  कोणत्याही विशेष करणांवर 2.5 वर्षानंतरही खाते बंद करून पैसे काढता येतात. खातेधारकाच्या मृत्यूनंतरही खाते मध्यंतरी बंद केले जाऊ शकते.

4. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post office Monthly Saving Scheme)

  • 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजने अंतर्गत खाते त्याच्या नावाने उघडू शकते.
  • एका व्यक्तीच्या नावाने अनेक खाती देखील उघडली जाऊ शकतात. कमीत कमी 1000 रुपये भरून ह्याचे खाते उगडू शकतो. 
  • ह्या अगोदर आपण 4.5 लाखापर्यत्न रक्कम जमा करू शकत होतो, पण 2023 च्या बजेट मध्ये सरकारने 4.5 लाखांवरून 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यातील ठेवीची मर्यादा 9 लाखांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 पासून ह्याचा लाभ आपण घेऊ शकतो

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत 5 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. तुमच्या ठेवीच्या बदल्यात तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळते. 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतरही, जर तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते सुरू ठेवायचे असेल, तर तुम्ही पुढील 5 वर्षांसाठी त्याचे नूतनीकरण करू शकता. परंतु, असे केल्यावर, त्याचा व्याजदर लागू होईल, जो नूतनीकरणाच्या तारखेला लागू होता. जुने नाही त्यावर वार्षिक 7.1% दराने व्याज मिळते. पण, यावर करात  कोणतेही सूट आपल्याला भेटत नाही. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते मुलाच्या नावाने त्याच्या पालकाच्या वतीने उघडले जाऊ शकते. 10 वर्षांखालील मूल हे खाते स्वतःच्या नावाने उघडू शकते. 2 किंवा 3 लोक एकत्रितपणे संयुक्त मासिक उत्पन्न योजना खाते उघडू शकतात.

5. PPF अकाउंट योजना (PPF Account Scheme)

  • कमीत कमी 500 रुपये जमा करून तुम्ही PPF खाते सुरू करू शकता. त्यानंतर दरवर्षी किमान 500 रुपये जमा करणे बंधनकारक आहे. PPF अकाऊंट मध्ये अधिकतम पैसे जमा करण्याची सीमा 1.5 लाख रुपये आहे. हे अकाऊंट 15 वर्षे चालते आणि काही करणांनुसार हे बंद केले जाऊ शकते. 
  • 18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक त्याच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकतो. हे खाते मुलाच्या नावाने त्याच्या/तिच्या पालकांच्या किंवा कायदेशीर पालकाच्या वतीने देखील उघडले जाऊ शकते. जर मुलाच्या नावाने खाते उघडल्यास मूल 18 वर्षांचे होईपर्यंत, त्याचे पीपीएफ खाते चालविण्याची जबाबदारी पालकाची असेल. संयुक्त खाते उघडता येत नाही. आणि मुख्य म्हणजे एका व्यक्तीच्या नावाने दुसरे खाते उघडता येत नाही.
  • सध्या एप्रिल 2023 मध्ये सरकारने PPF अकाऊंट वर कोणतेही व्याजामध्ये दरवाढ केली नाही. सध्या सरकार 7.1 टक्के व्याज देत आहे. सरकार दर तिमाहीपूर्वी त्यांचे नवीन व्याजदर जाहीर करते, परंतु 1 एप्रिल 2020 पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही
  • काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, खाते मध्येच बंद केले जाऊ शकते. जसं की- ·       
  • खातेदाराच्या गंभीर आजाराच्या बाबतीत ·       
  • जोडीदार किंवा मुलांचा गंभीर आजार असल्यास ·       
  • स्वतःच्या किंवा मुलांच्या उच्च शिक्षणासाठी ·       
  • खातेदाराने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतल्यावर
  • Ø  15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही, आपण इच्छित असल्यास, PPF खाते पुढील 5 वर्षांसाठी देखील वाढविले जाऊ शकते. आपण इच्छित असल्यास, आपण खाते विस्तारादरम्यान पैसे जमा करण्याचा पर्याय निवडू शकता किंवा आपण इच्छित असल्यास, आपण काहीही जमा न करता 5 वर्षे खाते विस्तार निवडू शकता. त्यानंतरही, पीपीएफ खात्याची मुदत 5-5 वर्षांसाठी कितीही वेळा वाढवता येते.

६. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

महिला सम्मान बचत पत्र योजना
महिला सम्मान बचत पत्र योजना

भारत सरकारने आपल्या देशातील महिलांना गुंतवणुकीत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पबचत योजनेअंतर्गत महिला सन्मान बचत योजना (Mahila Sanman Bachat Yojana Marathi) ही नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात. ह्या अगोदर किवा आता महिलांना पोस्ट ऑफिस मध्ये FD केल्यावर 7% ह्या प्रमाणे व्याज भेटते ते पण 5 वर्ष गुंतवणूक केल्यावर, पोस्ट ऑफिस मध्ये 2 वर्षे पैसे गुंतवणूक केल्यावर 6.8% ह्या प्रमाणे पैसे भेटतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषणेनंतर, या योजनेची अधिसूचना वित्त मंत्रालयाने जारी केली आहे, म्हणजेच आता तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर केवळ 2 वर्षात 7.5 टक्के व्याज दिले जाईल. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Sanman Bachat Yojana Marathi) 1 फेब्रुवारी 2023 रोजी नवीन वित्तीय वर्षाचे बजेट मांडण्यात आले त्या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र योजना (महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC) या नवीन योजनेची घोषणा केली. ह्या योजनेची सुरवात 1 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे. महिला सन्मान बचत योजना ही एक वन टाइम गुंतवणूक करण्याची योजना आहे.

  • ज्यामध्ये तुम्ही 1000 रुपये पासून ते 2 लाख रुपया पर्यत्न गुंतवणूक करू शकता.
  • ह्या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करायची मर्यादा आहे.
  • महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC ह्यामध्ये तुम्ही गुंतुवणूक केल्यास तुम्हाला 7.5% ह्या प्रमाणे व्याज दर भेटते. ह्यामध्ये कोणत्याही वयोगटातील महिला गुंतवणूक  करू शकतात.
  • जर तुम्ही पोस्ट ऑफिसआपले पैसे गुंतवणूक  करायला गेला तर 7% इंट्रेस्ट भेटू शकतो. ह्यामुळे महिलासाठी ही योजना फायदेशीर आहे
  • ह्या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 पर्यत्न घेऊ शकता, म्हणजेच तुम्ही ह्या कालावधी मध्ये तुम्ही ह्यामध्ये पैसे इन्वेस्ट केल्यास तुम्हाला 2 वर्षानंतर तुम्हाला ह्याची मॅच्युरिटी अमाऊंट भेटते.
  • एकदा का ही योजना सुरवात केल्यास तुम्ही मध्येच ह्याचे अकाऊंट बंद करू शकत नाही. अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाल्यास तुम्ही ह्याचे अकाऊंट बंद करू शकता.
  • मुदतपूर्व खाते 6 महिन्यांनंतरच बंद केले जाऊ शकते. पैसे काढण्यासाठी तुम्हाला त्यात फॉर्म-2 भरावा लागेल. अल्पवयीन मुले फॉर्म-3 भरू शकतील.
  • 1 वर्षानंतर 40% रक्कम काढता येते.

3 thoughts on “Post office Scheme in Marathi | पोस्ट ऑफिस बचत योजना मराठी | पोस्ट ऑफिस योजना 2023 मराठी |(नवीन) पोस्ट ऑफिस योजना 2023”

Leave a comment