महिला सम्मान बचत पत्र योजना देणार बँक ठेवीपेक्षा जास्त व्याज , पोस्ट खात्यांच्या योजनेपेक्षा अधिक व्याजदर लाभाची संपूर्ण माहिती

Mahila Sanman Saving Certificate

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान महिलांसाठी या योजनेची  घोषणा होताच, स्मृती इराणी यांच्यासह संसदेत उपस्थित असलेल्या सर्व महिला खासदारांनी टेबलावर हात मारून आनंद व्यक्त केला. होय, या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. महिला सन्मान बचत पत्र योजना जाहीर झाली आहे. या अंतर्गत, महिला किंवा मुलीच्या नावावर दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते आणि या बचतीवर 7.5% निश्चित व्याज दिले जाईल. अर्थमंत्री म्हणाल्या, ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासोबतच एक वेळ नवीन अल्पबचत योजना महिला सन्मान बचत पत्र मार्च 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल. या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 7.5% निश्चित व्याजदर असेल. यामध्ये अंशतः पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा करताच पंतप्रधान मोदींसह सर्व सदस्यांनी टेबलावर हात मारून आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली.

या योजनेच्या अंतर्गत देशातील महिला आणि मुलींना बचतीचे अधिक लाभ देण्यासाठी, 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना महिला सन्मान बचत पत्र योजना देशांतर्गत सुरू करण्याची घोषणा केली. तुम्ही महिला सन्मान बचत पत्रामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ठेवीवर सरकारकडून 7.5% दराने व्याज मिळेल. या योजनेत गुंतवलेले पैसे 2 वर्षांसाठी जमा केले जातील आणि त्यानंतर तुमची सर्व रक्कम व्याजासह तुम्हाला परत केली जाईल.

भारत सरकारची ही योजना मार्च 2025 पर्यंत लागू असेल. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी  कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली, महिला सन्मान बचत पत्र खाते उघडू शकतात. महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. सरकारकडून ही योजना विशेषतः महिला व मुलींसाठी सुरू करण्यात येत आहे. आणि तसेच महिलांना या बचत पत्रामध्ये अंशतः पैसे काढण्याची सुविधा देखील मिळणार आहे. महिला सन्मान बचत पत्र जाहीर झाल्यापासून सरकारचे मोठ्याप्रमाणात खूप कौतुक होत आहे

महिला सम्मान बचत पत्र  योजनेच्या आधारे महिला किंव्हा मुलींच्या नावाने ह्या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो . तसेच या योजनेमध्ये जास्तीत जास्त २ लाख पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते.ह्या योजनेच्या आधारे लाभार्त्याना निश्चित ७.५ % व्याज दर चक्रवाढ पद्धतीने  मिळेल .लक्षात घ्या हि योजना एकदा गुतंवणूक करण्याची योजना आहे , येत्या दोन वर्षा पर्यंत ह्या योजनेचा लाभ घेता येईल . समजा दोन वर्षात गरज लागल्यास यातील काही रक्क्म काढता येउ शकते .

महिला सन्मान बचत पत्र योजना 2023 Highlights 

बचत योजनामहिला सन्मान बचत पत्र योजना
व्दारा सुरुभारत सरकार
योजना आरंभ2023
लाभार्थीदेशातील मुली आणि महिला
लाभ2 लाखाच्या गुंतवणुकीवर 7.5% व्याज
विभागपोस्ट ऑफिस
अर्ज करण्याची पद्धतपोस्ट ऑफिस मध्ये
उद्देश्यमहिलांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्त व्याज प्रदान करणे
अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
वर्ष2023

  • महिला सम्मान बचत योजना आणि बँक ठेव व्याज फरक
योजनाव्याजदर %
२ वर्ष बँक ठेव६.८ %
भविष्य निर्वाह निधी  योजना७. १ %
नॅशनल बचत पत्र योजना७ %
सुकन्या समृद्धी योजना७. ६ %
किसान विकास पत्र७.२ %
जेष्ठ नागरिक  बचत योजना८ %
बँक FD६. ७५ %
मासिक  ठेव खाते७.१%
महिला सम्मान बचत योजना७.५
  • महिला सम्मान बचत पत्र योजना लाभ
  • हि योजना केंद्र सरकार अंतर्गत आहे.
  • महिला सन्मान बचत पत्र योजेनेचा व्याजदर हा  ७. ५ % . चक्रवाढ पद्धतीने आहे
  • महिला सन्मान बचत पत्र योजेनेमध्ये  कमीत कमी १०००  व जास्तीत जास्त २ लाख पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते .
  • मुदतीचा कालावधी हा  २ वर्षाचा आहे .परंतु दोन वर्षात गरज लागल्यास यातील काही रक्क्म काढता येउ शकते
  • महिला सम्मान बचत पत्र योजनेची पात्रता
  • महिला सम्मान बचत पत्र योजना खाते काढण्यासाठी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे  .
  • महिला सन्मान बचत पत्र हे फक्त  फक्त महिला आणि मुली नावेच काढता येते .
  • कोणत्या पण वयाच्या मुली आणि महिला ह्या महिला सम्मान बचत पत्र योजना खाते  सुरु करू शकतात .

·        महिला सन्मान बचत प्रमाणपत्र गणना

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र करण्याचे फायदे पाहूया. समजा तुम्ही या योजनेंतर्गत दोन वर्षांसाठी रु.2,00,000 गुंतवले; तुम्हाला वार्षिक 7.5% व्याज मिळेल. अशा प्रकारे, पहिल्या वर्षी, तुम्हाला मूळ रकमेवर रु. 15,000/- मिळतील आणि दुसर्‍या वर्षी, तुम्हाला रु. 16,125/- मिळतील. अशा प्रकारे, दोन वर्षांच्या शेवटी, तुम्हाला 232044 (2,00,000 प्रारंभिक गुंतवणूक + दोन वर्षांसाठी  32044 व्याज) मिळतील.

महिला सम्मान बचत पत्र योजना हि योजना एक छोटीसी बचत योजना आहे . याची घोषणा देशाच्या अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२३ केली. आपल्या ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास पोस्ट ऑफिस मध्ये भेट द्यावी लागेल . भारतातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेची सुरवात झाली आहे

  • महिला सम्मान बचत पत्र २०२३ योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो

1 thought on “महिला सम्मान बचत पत्र योजना देणार बँक ठेवीपेक्षा जास्त व्याज , पोस्ट खात्यांच्या योजनेपेक्षा अधिक व्याजदर लाभाची संपूर्ण माहिती”

Leave a comment